IND vs NZ 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर खेळवला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सुरु झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फंलदाजी करताना सात विकेट गमावत 306 धावा केल्या. श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि शुभमन गिलच्या अर्ध शतकांच्या जोरावर भारतीय संघाने 306 धावांची खेळी केलीय. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या. तर शिखर धवनने 72 आणि शुभमन गिलने 50 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 16 चेंडूत 37 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन आणि टिम साऊदी यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या.


भारताची इनिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. धवनने 21व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. शुभमन गिलने 64 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी 124 धावांची भागीदारी केली. गिलला लॉकी फर्ग्युसनने 50 धावांवर बाद केले. शिखर धवन 72 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत 33व्या षटकात 15 धावा काढून बाद झाला. त्यानंतर लगेचच त्याच षटकात सूर्यकुमार यादव देखील बाद झाला.


यानंतर मैदानावर जम बसवत श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी 77 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन 46व्या षटकात 36 धावा काढून बाद झाला. शेवटच्या षटकात श्रेयस अय्यरला 76 चेंडूत 80 धावा करून टीम साऊदीने बाद केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यर यांच्यात 24 चेंडूत 46 धावांची भागीदारी झाली. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूर बाद झाला. दरम्यान, या सामन्यात भारताचे युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.