न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे
मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या सगळ्या खेळाडूंना वनडे सीरिजमध्ये संधी देण्यात आली आहे. फक्त दुखापतग्रस्त शिखर धवन टी-२० आणि वनडे सीरिजला मुकणार आहे. शिखर धवनऐवजी टी-२० सीरिजमध्ये संजू सॅमसनची तर वनडेमध्ये पृथ्वी शॉची निवड झाली आहे.
भारतीय टीम या दौऱ्यासाठी न्यूझीलंडमध्ये पोहोचली आहे. संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ हे खेळाडू आधीच न्यूझीलंडमध्ये आहेत. हे दोन्ही खेळाडू भारत-ए कडून न्यूझीलंडविरुद्ध सीरिज खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये फिल्डिंग करत असताना शिखर धवनच्या खांद्याला दुखापत झाली. यानंतर धवन बॅटिंगलाही आला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेमध्ये धवन फॉर्ममध्ये होता. धवनने पहिल्या वनडेमध्ये ७४ रन आणि दुसऱ्या वनडेमध्ये ९६ रनची खेळी केली होती. त्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या टी-२०मध्येही धवनने अर्धशतक केलं होतं. दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनला पुन्हा एकदा दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.
भारतीय टी-२० टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव
वनडे टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, केदार जाधव