राजकोट : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघात दोन बदल करण्यात आलेत. तर भारतीय संघात मोहम्मद सिराज या सामन्यातून पदार्पण करतोय. 


सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा


आशिष नेहराने पहिल्या सामन्यानंतर निवृत्ती घेतली. त्यामुळे या सामन्यात मोहम्मद सिराजला संधी देण्यात आलीये.


पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारत या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. त्यामुळे दुसरा सामनाही जिंकत मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने कोहली अँड कंपनी मैदानात उतरेल.