वेलिंग्टन : इंग्लंडच्या दौऱ्यावर असतानाच भारताच्या न्यूझीलंडच्या दौऱ्याची घोषणा झाली आहे. जानेवारी २०१९ पासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यानंतर भारत लगेचच न्यूझीलंडला रवाना होईल. न्यूझीलंडच्या या दौऱ्यामध्ये ५ वनडे आणि ३ टी-२०चा समावेश आहे. पुरुषांच्या मॅचबरोबरच महिलाही न्यूझीलंडला जाणार आहेत. महिला टीम न्यूझीलंडमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० मॅचही खेळणार आहे.


भारतीय पुरुष टीमचं वेळापत्रक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ जानेवारी- पहिली वनडे, नेपियर


२६ जानेवारी- दुसरी वनडे- माऊंट मोनुनगाई


३१ जानेवारी- चौथी वनडे- हॅमिल्टन


३ फेब्रुवारी- पाचवी वनडे- वेलिंग्टन


६ फेब्रुवारी- पहिली टी-२०- वेलिंग्टन


८ फेब्रुवारी- दुसरी टी-२०- ऑकलंड


१० फेब्रुवारी- तिसरी टी-२०- हॅमिल्टन