Captain to Coach Rahul Dravid: सध्या सुरू असलेल्या ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या २१व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन फॉर्मात असलेले संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. थोड्याच वेळात हा सामना सुरु होईल. दोन्ही संघ स्पर्धेमध्ये आतापर्यंत अपराजित राहिल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही टीम्सनी आधीचे चार सामने अगदी सहज जिंकले आहेत. दरम्यान टीम इंडियाला मागच्या 20 वर्षात वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला हरवता आले नाही. 20 वर्षांपुर्वी म्हणजेच 2003 च्या वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टिम इंडियाने ही कामगिरी केली होती. त्यानंतर वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडवर मात करता आली नाही. टिम इंडियाचा तेव्हाचा कॅप्टन ते आताचा कोच असा प्रवास करणारा द्रविड काय रणनीती आखणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारत आणि न्यूझीलंड 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 10 वेळा न्यूझीलंड जिंकले आहे तर अवघ्या 3 वेळा टिम इंडियाला जिंकता आले आहे. ICC सामन्यात किवी युनिटवर भारताचा शेवटचा विजय दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथे 2003 एकदिवसीय विश्वचषकात मिळाला.


राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफ यांच्या मॅच-सेव्हिंग पार्टनरशिपमुळे भारताला सुपर सिक्स स्टेजच्या लढतीत ब्लॅक कॅप्सचा पराभव करता आला होता. पण त्यालाही आता 20 वर्षे झाली. 


न्यूझीलंडने गोलंदाजीचे शानदार प्रदर्शन करून भारताला मोठा धक्का दिला होता. पहिल्या हाफमध्ये झहीर खानच्या 4/42 च्या शानदार स्पेलमुळे किवीजचा संघ 45.1 षटकात अवघ्या 146 धावांत गुंडाळला गेला. भारताने लक्ष्याचा पाठलाग सहजतेने करेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात सारं गडगडलं. 


वेगवान गोलंदाज शेन बाँडच्या डॉक्यात वेगळ्या कल्पना सुरु होत्या. त्याने वीरेंद्र सेहवागला एका धावेवर माघारी पाठवले. तर सौरव गांगुलीला (३) शानदार यॉर्कर टाकून आऊट केले. त्यावेळी जबरदस्त फॉर्मात असलेला सचिन तेंडुलकरही अवघ्या 15 धावांवर झेलबाद झाला होता. दरम्यान बाँडच्या चौथ्या षटकात टर्निंग पॉईंट आला. राहुल द्रविडचा सोपा झेल ब्रेंडन मॅक्युलमला सोडला आणि न्यूझीलंडला हा झेल खूप महागात पडला.  हा तो क्षण होता जेव्हा न्यूझीलंडचा पराभव पत्करावा लागला होता. 


द्रविड आणि कैफ यांनी 129* धावांची भक्कम भागीदारी केली. यानंतर भारताने सामना सात विकेट्स आणि 54 चेंडू राखून जिंकला. 


राहुल द्रविडचा इतक्या वर्षाचा भक्कम अनुभव टिम इंडियाच्या मागे आहे. त्यामुळे टीम इंडिया आज चमत्कार करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.