Future Of Team India: भारतीय संघ आजपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा श्रीगणेशा करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचा विचार करता भारताला अजून चार कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. त्या दृष्टीने भारतासाठी ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील 5 कसोटी सामन्यांआधीची मालिका फार महत्त्वाची मानली जात आहे. मात्र कसोटी क्रिकेटच्या भविष्याचा विचार करुन भारतीय संघामध्ये काही प्रयोग केले जात आहेत. यासंदर्भात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी कर्णधार रोहित शर्मानेच पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.


गोलंदाजांची फळी तयार करणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघामध्ये निवड समितीने हर्षित राणा, मयांक यादव, नितीश रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा या चौघांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला आहे. भारताच्या मुख्य संघाबरोबरच या चार खेळाडूंची निवड करण्यामागे भारताने कसोटीच्या भविष्याचा विचार केला आहे असं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं. रोहित शर्माने भारतीय संघ फलंदाजांच्या बॅकअपप्रमाणे गोलंदाजांचा बॅकअप असावा म्हणून एकूण 8 ते 9 गोलंदाज कायम तयार असतील अशी तयारी केली जात असल्याचं सांगितलं. एखादा गोलंदाज जखमी झाला तर दुसरा गोलंदाज लगेच तयार असेल. एका खेळाडूवर निर्भर राहणं धोकादायक ठरु शकतं. भारताकडे फलंदाजांचे अनेक पर्याय आहेत तसं गोलंदाजांबरोबर असावं असा विचार करुन काही तरुण खेळाडूंना मुद्दा संघाच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न आहे असं रोहित शर्माने सांगितलं. मात्र हे सांगतानाच रोहित शर्माने भविष्यात कोणते दोन खेळाडू भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये महत्त्वाचं योगदान देतील याबद्दल भाष्यही केलं आहे.


या दोघांचा केला उल्लेख


"तुम्हाला कधीतरी एखाद्याला फास्ट ट्रॅकवर आणावं लागतं. हे सारं भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठीच करत आहोत. कोणी जखमी झालं असेल तरी त्याची जागा घेणारं दुसरं कोणीतरी तयार असेल असा संघ आम्हाला तयार करायचा आहे. नितीश आणि हर्षित दोघेही फार टॅलेंटेड आहेत. ते भविष्यात भारतीय संघाला फार स्थैर्य मिळून देतील. त्यांची क्षमता किती आहे हे आम्ही सध्या तपासत आहोत. कसोटी क्रिकेटबद्दल त्यांचं मत काय आहे हे त्यांच्याशी सरावादरम्यान आणि इतर वेळी चर्चा करुन जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. आम्हाला त्यांच्याबरोबर फारशी चर्चा करण्याची संधी मिळत नसल्याने जी संधी मिळेल ती आम्ही वापरुन घेतोय. त्यामुळेच ते मुख्य संघाबरोबर जास्तीत जास्त वेळ राहतील अशी आम्ही काळजी घेतो. ते भविष्यात कसोटी खेळणार आहेत असाच आमचा विचार असून तसेच आम्ही त्यांना तयार करतोय," असं रोहित शर्मा म्हणाला. 


टॅलेंट समोर आणावं


"आता काही तरुण खेळाडूंना संघाबरोबर राहण्याची संधी देऊन ते अंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तयार आहेत की नाही याची चाचपणी आम्ही करणार आहोत. खास करुन कसोटी क्रिकेटसाठी त्यांचा विचार केला जाईल. कसोटी क्रिकेट हे फार वेगळ्या पद्धतीचं आहे. या खेळाडूंकडे जे काही टॅलेंट आहे ते समोर आणू शकतात का हे आम्ही पाहत आहोत. ते आम्हाला काय देऊ इच्छितात, कशी कामगिरी करतात यावर आमचं लक्ष आहे. यामुळे आमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध राहतील," असं रोहित म्हणाला.