India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज जयपूरमध्ये खेळवला जात आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकातल्या खराब कामगिरीनंतर टीम इंडिया नवा कर्णधार आणि नव्या प्रशिक्षकासह नवी सुरुवात करणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यापैकीच एक नाव म्हणजे आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात व्यंकटेश अय्यरला भारतीय संघात (Team India) संधी देण्यात आली असून तो आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 



व्यंकटेश अय्यरचा आयडॉल


सामन्याआधी बीसीसीआयला (BCCI) दिलेल्या मुलाखतीमुळे व्यंकटेश अय्यर चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने आपल्या लहानपणीच्या हिरोविषयी माहिती दिली आहे. क्रिकेटप्रेमींना हे जाणून आश्चर्य वाटेल की व्यंकटेशचा बालपणीचा हिरो क्रिकेटर नसून तो WWE चा फॅन आहे. WWE सुपरस्टार अंडरटेकर हा त्याचा हिरो आहे. व्यंकटेशने मुलाखतीत सांगितले की तो अंडरटरचा खूप मोठा चाहता आहे आणि अंडरटेकरने त्याचा ब्लॅक बेल्ट आपल्याला गिफ्ट द्यावा अशी त्याची इच्छा आहे.



अष्टपैलू खेळाच्या जोरावर संधी


एक अष्टपैलू खेळाडू म्हणून व्यंकटेश अय्यरला भारतीय टी20 संघात संधी मिळाली आहे. वेगवान धावा करण्याबरोबरच विकेट घेण्यातही व्यंकटेश अय्यर माहिर आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात अय्यरने 10 सामन्यात 370 धावा केल्या होत्या आणि 3 विकेटही त्याने घेतल्या होत्या.