राजकोट : शनिवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यंच्यात झालेली दुसरी टी-२० मॅच दोन्ही टीम्ससाठी खूपच महत्वाची होती. ही मॅच जिंकली असती तर टीम इंडियाने सीरिज आपल्या नावावर केली असती. मात्र, या मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टी-२० मॅच प्रमाणेच दुसऱ्या मॅचमध्येही टीम इंडिया चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने केलेल्या खराब प्रदर्शनामुळे प्रेक्षकांत नाराजी पसरली.


कॅप्टन विराट कोहली वगळता एकाही प्लेअरला चांगला परफॉर्मन्स दाखवता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाला ४० रन्सने पराभव स्विकारावा लागला. पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने बॅट्समनला कारणीभूत ठरवलं. मात्र, त्याच वेळी विराटने धोनीचं कौतुक केलं.


न्यूझीलंडच्या टीमकडून कोलिन मुनरोने जबरदस्त इनिंग खेळत १०९ रन्स केले. त्यामुळे न्यूझीलंडच्या टीमने भारतासमोर विजयासाठी १९७ रन्सचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या टीम इंडियाला २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत केवळ १५६ रन्सपर्यंत मजल मारता आली. 


विराटने केलं धोनीचं कौतुक...


मॅच संपल्यानंतर कॅप्टन विराट कोहलीने म्हटलं की, "बॅट्समनला चांगलं प्रदर्शन करता आलं नाही. ज्यावेळी तुम्ही २०० रन्सचा पाठलाग करत असता त्यावेळी सर्वच बॅट्समनला २०० च्या स्ट्राईक रेटने स्कोर करायचा असतो. मी पूर्णपणे प्रयत्न केला. धोनीनेही शेवटी चांगला खेळ दाखवला, मात्र, आमचं काम खूपच कठीण होतं."


दोन बॉलर्सचंही केलं कौतुक


"न्यूझीलंडच्या बॅट्समनने चांगली कामगिरी केली. असं वाटत होतं की, न्यूझीलंड २३५-२४० रन्स कले मात्र, त्यांना आम्ही रोखलं. याचं श्रेय जातं ते बुमराह आणि भुवनेश्वर या दोघांना" असं कॅप्टन विराट कोहलीने म्हटलं.