मुंबई : भारतीय संघाला न्यूझीलंडकडून ६ विकेट्सनी हार पत्करावी लागली. दरम्यान क्रिकेट चाहते सोशल मीडियावर टीमच्या सिलेक्शनवर सडकून टीका करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने पराभवावर आपले मत मांडले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि रॉस टेलर यांच्या शतकी भागीदारीची प्रशंसा केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवाला आपल्या फलंदाजांना जबाबदार ठरविले.


२८१ हे टार्गेट योग्य असल्याचे आम्हाला वाटले होते पण न्यूझीलंडने आमच्यावर सातत्याने दबाव टाकला आणि त्यांचा स्कोअर बनत गेल्याचे कोहलीने सांगितले. 
रॉस आणि टॉम यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांनी आम्हाला काही संधी दिली नाही. जेव्हा तुम्ही २०० रन्सची भागीदारी करता तेव्हा तुम्ही जिंकण्याचा हक्क आहे असे तो म्हणाला.


कोहलीने सांगितले की, "आम्ही शेवटच्या १३-१४ षटकात २० ते ३० धावा कमी केल्या. आम्हाला बॅटींगमध्ये यापेक्षा चांगले प्रदर्शन करावे लागणार असल्याचे त्याने सांगितले. जर अजून एक किंवा दोन फलंदाजांनी धावा केल्या असत्या तर आम्ही 40 धावा अधिक काढू शकलो असतो. "