मुंबई : टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. यंदाचा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जात असून भारत यापूर्वी सराव सामने खेळतोय. दरम्यान भारत आज न्यूझीलंडविरूद्ध सराव सामना खेळणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला आहे. गब्बामध्ये होणारा सामना ब्रिस्बेनमध्ये तीन तास पावसामुळे रद्द करण्यात आलाय. भारतीय वेळेनुसार 4 वाजेपर्यंत 5-5 ओव्हर्सचा सामना होण्याची शक्यता होती. मात्र अधिकाऱ्यांनी आता तो रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.


पावसामुळे रद्द झाला सामना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियामध्ये आजही हवामान खराब आहे. बुधवारी, 19 ऑक्टोबर रोजी खराब हवामानामुळे ICC T20 वर्ल्डकप 2022 चे दोन सराव सामने अनिर्णित राहिले. पहिल्या अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील एक डाव संपल्यानंतर सुरू झालेला पाऊस थांबला नाही. पाकिस्तान आणि अफगाण टीम गाब्बा मैदानावर भिडले होते. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंडलाही याच मैदानावर सामना खेळावा लागला होता. त्यावेळी देखील पावसामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 


दुसरा सराव सामना


टीम इंडियाचा न्यूझीलंडचा (India vs New Zealand) दुसरा सराव सामना होणार आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 रन्सने पराभव केला होता. त्यामुळे आज न्यूझीलंडविरूद्ध दुसरा सराव सामना खेळवण्यात येणार होता. मात्र तो रद्द करण्याच आला आहे. 


पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध 


टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (kl rahul) ही जोडी सलामीला उतरणार आहे. केएल राहुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं.


T20 विश्वचषक 2022 मध्ये भारताविरुद्ध


  • भारत विरुद्ध पाकिस्तान - पहिला सामना - 23 ऑक्टोबर (मेलबर्न)

  • भारत विरुद्ध अ गट उपविजेता - दुसरा सामना - 27 ऑक्टोबर (सिडनी)

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - तिसरा सामना - ३० ऑक्टोबर (पर्थ)

  • भारत विरुद्ध बांगलादेश - चौथा सामना - २ नोव्हेंबर (अ‍ॅडलेड)

  • भारत विरुद्ध गट ब विजेता - सामना 5 - 6 नोव्हेंबर (मेलबर्न)