हिमाचल प्रदेशात हवमाना खात्याकडून पुढच्या 48 तासांत वातावरण खराब असून पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. हिमाचल प्रदेशात उंच पर्वतीय भागात हलकी बर्फवृष्टी आणि सखल भागात पावसाची माहिती देण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात धरमशालेत येथे होणाऱ्या सामन्याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी हवामान पूर्णपणे स्वच्छ राहावे आणि हवामानामुळे कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उद्या धरमशालामध्ये पाऊस पडू शकतो. धर्मशालेत सुमारे ३ तास ​​पावसाची शक्यता आहे. मात्र पाऊस कधी पडेल, याबाबत काहीच सांगता येत नाही, कारण सकाळपासून सायंकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.



अशा परिस्थितीत धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यावर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. हिमाचलच्या इतर जिल्ह्यांमध्येही याचा परिणाम होईल. उंच पर्वतीय भागात हलकी बर्फवृष्टी अपेक्षित आहे तर सखल भागात पाऊस पडेल. तापमानात 2 ते 3 अंशांची घसरण होणार असल्याने येत्या काही दिवसांत सकाळ-संध्याकाळ थंडी पडणार आहे. हिमाचल प्रदेशात २४ तारखेपासून हवामान सामान्य होईल.



 ICC एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 21 वा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ असे आहेत ज्यांनी या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत रविवारी धर्मशाला येथे स्पर्धात्मक सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांच्या विजयाची शक्यता 50-50 अशी आहे. अशा परिस्थितीत उद्या पाऊस पडला तर क्रिकेटप्रेमींना निराशेला सामोरे जावे लागू शकते.