IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. रोहित शर्मान 85 चेंडू 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. तर शुभमन गिलने 78 चेंडूत 5 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. या सामन्यात चौकार आणि षटकारांचा अक्षरश: वर्षाव झाला. भारताने आपल्या डावात एकूण 19 षटकार आणि 33 चौकार मारले. 


वनडे षटकारांच्या यादीत रोहीत तिसऱ्या स्थानी


  1. COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शाहिद आफ्रिदी- 398 सामन्यात 351 षटकार 

  2. ख्रिस गेल- 301 सामन्यात 331 षटकार

  3. रोहित शर्मा- 241 सामन्यात 273 षटकार

  4. सनथ जयसुर्या- 445 सामन्यात 270 षटकार

  5. महेंद्रसिंग धोनी- 350 सामन्यात 229 षटकार



एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत भारत दहाव्या स्थानी


दुसरीकडे, एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत इंग्लंडचा संघ आघाडीवर आहे. इंग्लंडने एका डावात एकूण 26 षटकार मारले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानीही इंग्लंडच असून अनुक्रमे 25 आणि 24 षटकार ठोकले आहेत. चौथ्या स्थानी वेस्ट इंडिज (23), पाचव्या स्थानी न्यूझीलंड (22), सहाव्या स्थानी वेस्ट इंडिज (22), सातव्या स्थानी इंग्लंड (21), आठव्या स्थानी दक्षिण आफ्रिका (20), नवव्या स्थानी इंग्लंड (20) आणि दहाव्या स्थानी 19 षटकारांसह भारत आहे. 


बातमी वाचा- IND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!


भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, युझवेंद्र चहल


न्यूझीलंड संघ- फिन एलेन, डेवॉन कॉनवे, हेन्री निकोलस, डेरील मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, जेकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर