भारताच्या `या` मोठ्या खेळाडूला शेवटची संधी? गमावू शकतो टी-20 विश्वचषकाच्या संघातीलही स्थान!
आयपीएल गाजवणारा `हा` खेळाडू गमावू शकतो भारतीय संघातील जागा!
Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये उद्या पुन्हा एकदा भारत वि. पाकिस्तान (Asia Cup 2022 Ins vs Pak) असा सामना रंगणार आहे. (Asia Cup 2022) साखळी सामन्यात भारतान पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान आता पुर्ण तयारीनिशी पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. त्यामुळे भारताला आता आणखी उत्कृष्ट प्रदर्शनाची गरज आहे. मात्र सर्वात मोठी चिंता आहे ती म्हणजे भारताचा उपकर्णधार के. एल. राहुलच्या फॉर्मची.
के. एल. राहुल जर उद्याच्या सामन्यातही दमदार कामगिरी करू शकला नाही तर त्याची अंतिम अकरामधील जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे. के. एल. ने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातही अपयशी ठरला होता. त्यानंतर दुबळ्या हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यातही त्याने 39 धावांसाठी 36 चेंडू घेतले होते. इतकंच नाहीतर येत्या विश्वचषकाच्या संघातूनही त्याला वगळलं जाऊ शकतं. 15 सप्टेंबरपर्यंत भारताला संघ जाहीर करायचा आहे.
के. एल. राहुल आयपीएलमधील प्रदर्शनावेळी रोहित शर्मासह त्याचं नावं कर्णधारपदाच्या रेसमध्ये होतं. मात्र आता अशी परिस्थिती झाली आहे की त्याचं संघातील स्वत:चं स्थान धोक्यात आलं आहे. त्यामुळे के. एल. राहुलला उद्याच्या सामन्यात छाप पाडता यायला हवी.
दरम्यान, रविवारी होणाऱ्या सामन्यामध्ये राहुलच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. भारताचा स्टार म्हणून हार्दिक पांड्या आता परिपक्व होत चालल्याचं त्याच्या खेळीतून दिसत आहे. याची झलक त्याने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात दाखवूनही दिली. त्यामुळे हार्दिकच्या नावाची उपकर्णधारपदासाठी क्रीडा वर्तुळात चर्चा आहे. राहुल उद्या कशाप्रकारे कमबॅक करतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.