मुंबई : आशिया कपमध्ये क्रिकेट चाहत्यांना आज एक सुपरहिट सामना पाहायला मिळणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने उभे ठाकणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना एक मेजवानी मिळणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत ११ वेळा आमनेसामने आले असून असून भारतानं सहा वेळा तर पाकिस्ताननं ४ वेळा विजय मिळवला आहे. तर एक लढत ही ड्रॉ ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्याचं दडपण दोन्ही संघावर असल्याचं मत पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज खान यानं व्यक्त केलं आहे. 


भले स्पर्धेचं विजेतपद गमावलं तरी चालेलं मात्र पाकिस्तानविरुद्धची लढत जिंकलीच पाहिजे अशीच भावना भारतीय क्रिकेट चाहत्यांची नेहमी असते. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आशिया चषकात आतापर्यंत झालेल्या थरारक लढतींमध्ये बहुतेकवेळा भारतानंच बाजी मारली आहे.


कुठे होणार सामना: भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा सामना दुबईमध्ये खेळला जाणार आहे.


वेळ : भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार आहे.


कुठे पाहू शकता : स्टार स्पोर्ट्स 1/HD आणि स्टार स्पोर्ट्स सेलेक्ट 1/HD वर तुम्ही हा सामना पाहू शकता.