India vs Pakistan U19 Asia Cup 2024 Live Streaming: आता थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) क्रिकेटच्या मैदानात मोठे युद्ध होणार आहे. दोन्ही देशांमधला हा शानदार सामना 2024 च्या अंडर-19 आशिया कपमध्ये होणार आहे. शनिवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर अ गटातील सामन्यात हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकेमेकांचा सामना करतील. भारत आणि पाकिस्तान याच सामन्याने या मोहिमेची सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारताने आतापर्यंत विक्रमी 9 वेळा विजेतेपद पटकावले आहे. आज युवा टीम इंडियाचे लक्ष दहाव्या विजेतेपदावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी 19 वर्षाखालील आशिया कप 2024 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. यापैकी भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या हा सामना कधी, कुठे आणि कसा बघता येईल हे जाणून घ्या.  



अंडर-19 आशिया कप 2024 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना कधी खेळला जाईल?


अंडर-19 आशिया चषक 2024 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान  सामना शनिवार, 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे.


हे ही वाचा: IND vs PAK: या महिन्यात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' ठिकाणी होणार सामना


भारत विरुद्ध पाकिस्तान  सामना कोठे खेळवला जाईल?


अंडर-19 आशिया कप 2024 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.


भारत विरुद्ध पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होईल?


अंडर-19 आशिया कप 2024 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान  सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल.


हे ही वाचा: लिलावात अनसोल्ड राहणं जिव्हारी लागलं, 'या' भारतीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय; क्रिकेट विश्वात खळबळ


भारत विरुद्ध पाकिस्तान सामना लाइव्ह कुठे बघता येईल?


भारत विरुद्ध पाकिस्तान  सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केला जाणार आहे. 


भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार?


तुम्ही Sony Liv ॲपवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.


हे ही वाचा: Photos: यशस्वी जयस्वालचं मुंबईतील 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आलिशान युरोप-इन्स्पायर घर बघितलं का?


कशी असेल टीम?


  • भारताचा U19 संघ: हार्दिक राज, वैभव सूर्यवंशी, प्रणव पंत, केपी कार्तिकेय, हरवंश सिंग (विकेटकीपर), मोहम्मद अमन (कर्णधार), आयुष म्हात्रे, समर्थ नागराज, निखिल कुमार, युधाजित गुहा, चेतन शर्मा, किरण चोरमले, अनुराग कवाडे, आंद्रे सिद्धार्थ सी, मोहम्मद अनॉन.

  • पाकिस्तान अंडर 19 संघ: मोहम्मद तय्यब आरिफ, फरहान युसूफ, शाहजेब खान, साद बेग (कर्णधार), हारून अर्शद, अली रझा, अहमद हुसेन, मोहम्मद रियाजुल्ला, उस्मान खान, अब्दुल सुभान, फहम-उल-हक, मोहम्मद हुजैफा, उमर झैब, मोहम्मद अहमद, नावेद अहमद खान.