IND Vs SA: मोहम्मद सिराजवर रोहित शर्मा वैतागला, दोन सिक्स पडणार महागात!
दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 228 धावाचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजचं गचाळ क्षेत्ररक्षण दिसलं. यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच वैतागला होता.
India Vs South Africa 3rd T20: दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 228 धावाचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं गडी 3 गमवून 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावा दिल्या. रिलीचं शतक आणि क्विंटनच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं धावांचा डोंगर रचला. रिलीनं 48 चेंडूत शतक ठोकलं. या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. क्विंटननं 43 चेंडूत 68 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजचं गचाळ क्षेत्ररक्षण दिसलं. यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच वैतागला होता. दोन झेलचं रुपांतर दोन सिक्समध्ये झालं आणि 12 धावा आल्या.
शेवटच्या षटकातच्या चौथ्या चेंडूवर डेविड मिलारने उंच फटका मारला. सीमारेषेवर असलेल्या सिराजने झेल घेतला. मात्र पाय सीमारेषेला लागल्याने षटकार देण्यात आला. यापूर्वी आर. अश्विनच्या गोलंदाजीवर रिलीचा झेल सोडला होता आणि चेंडू थेट सीमारेषे पलीकडे गेला होता. त्यामुळे दोन झेलचं रुपांतर सिक्समध्ये झालं. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच वैतागला होता.
दक्षिण आफ्रिका संघ- टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रिली रोसॉव, एडन मार्करम, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्ब्स, ज्वेन प्रेटोरियस, वायन पारनेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर. अश्विन, हर्षल पटेल, दीपक चाहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज