रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि २०२ रननी विजय झाला आहे. या विजयासोबतच भारताने ३ टेस्ट मॅचची ही सीरिज ३-०ने खिशात घातली आहे. या कामगिरीनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीमचं कौतुक केलं आहे. नव्याने ओपनरच्या भूमिकेत आलेल्या रोहित शर्माने परिस्थितीनुसार योग्य बदल केले आणि हे आव्हान उत्तम पद्धतीने पेललं, असं शास्त्री म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य रहाणे हा नेहमीच मधल्या फळीत आहे. त्याला पुन्हा एकदा स्वत:लाच शोधायचं होते, ते त्याने करून दाखवलं. सुरुवातीला ही खेळपट्टी कठीण होती, पण रोहितने हे आव्हान पेललं, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.



सीरिज जिंकल्याबद्दल शास्त्रींनी बॉलरचंही कौतुक केलं. खड्ड्यात गेली खेळपट्टी. २० विकेट घेणं महत्त्वाचं आहे. मग ते मुंबई असो, ऑकलंड, मेलबर्न कुठेही असो. जर आम्ही २० विकेट घेतो, तर आमची बॅटिंग फरारीसारखी आहे. तुमच्याकडे २० विकेट घेणारे ५ बॉलर असणं, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं आहे.