राहुल-पांड्याचा डान्स व्हिडिओ, लोकांकडून खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला
साऊथ आफ्रिके विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
नवी दिल्ली : साऊथ आफ्रिके विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
त्यामुळे ३ सामन्यांच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या पुढील खेळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी फलंदाजांच्या अपयशामुळे सामना गमवावा लागला.
या सामन्यानंतर केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत हार्दिक पांड्या आणि केएल राहुल मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओत दोघे एक डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. ‘कुणी चांगलं केलं?’ असं कॅप्शन त्यासाठी दिलं गेलंय.
हा व्हिडिओ शेअर केल्यावर काहींनी यावर चांगल्या कमेंट केल्या आहे तर काहींनी टीकाही केली आहे. काही लोकांनी दोघांनाही मॅचवर लक्ष देण्याचा सल्ला दिलाय.