विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ओपनर मयंक अग्रवालने शानदार द्विशतक झळकावलं आहे. याचबरोबर त्याने अनेक रेकॉर्डही केली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक करणारा अग्रवाल हा सेहवागनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. मयंक अग्रवालची भारतातली ही पहिलीच टेस्ट मॅच आहे. मायभूमीतल्या आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये फक्त शतकच नाही, तर द्विशतक करण्याचा विक्रमही मयंक अग्रवालने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयंक अग्रवाल ३७१ बॉलमध्ये २१५ रन करून आऊट झाला. तर दुसरीकडे टेस्टमध्ये पहिल्यांदाच ओपनिंगला बॅटिंग करणाऱ्या रोहित शर्माने १७६ रनची खेळी केली. मयंकने दुसऱ्या दिवसाच्या चहाच्या विश्रांतीआधी आपलं द्विशतक पूर्ण केलं. केशव महाराजने टाकलेला बॉल मयंकने लाँग ऑफला मारत मयंकने द्विशतक केलं.


याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २००८ साली चेन्नईमध्ये सेहवागने ३१९ रनची खेळी केली होती. हा सेहवागच्या कारकिर्दीतला सर्वाधिक स्कोअर होता.


मयंक अग्रवालची कारकिर्दीतली ही पाचवी टेस्ट मॅच आहे. मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये मयंकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये पहिली टेस्ट मॅच खेळली होती. आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये मयंकने ७६ रनची खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये मयंकला ४४ रन आणि मग सिडनी टेस्टमध्ये ७७ रन करता आले होते.