नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेला मात देत एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत ४-१ ने आघाडी घेतलीए. धडाकेबाज बॅट्समन रोहित शर्मा आणि चायनामॅन बॉलर कुलदीप यादव पाचव्या मॅचचे हिरो ठरले. पण या दोघांपेक्षाही चर्चा होतेय ती हार्दिक पांड्याची.


कपिल देवशी तुलना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आधीच्या ४ सामन्यात हार्दिक चांगला खेळ करु शकला नाही. त्याची तुलना कपिल देवशी नेहमी केली जाते.


पाचव्या सामन्यात पांड्या आऊट झाल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.


पण जरी त्याने बॅटींगमध्ये काही कमाल दाखवली नसली तरी बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये त्याने कमाल केली. 


ड्युमिनी आणि डिविलिर्सला बाहेरचा रस्ता 


 'झीरो'वर आऊट झाल्याचा बदला त्याने चांगला स्पेल टाकून घेतला. मॅच नाजुक वळणावर होती.


हाशिम आमला संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चालला असताना पांड्याच्या 'थ्रो'मुळे आमला  रनआऊट झाला. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.


आमलाने ७१ रन्स बनविले. त्यानंतरचा दबाव आफ्रिकेचा संघ सहन करु शकला नाही. 


शानदार बॉलिंग आणि फिल्डिंग 


आपल्या बॉलिंगने त्याने ड्युमिनी आणि डिविलियर्सला आऊट करत विजयाचा मार्ग मोकळा केला. तसेच एक शानदार कॅच पकडून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.