मुंबई: विराट कोहलीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कसोटी कर्णधारपद कोणाकडे जाणार यावरून चर्चा आहे. कर्णधारपदासाठीच्या स्पर्धेत रोहित शर्मा आणि के एल राहुल यांची नावं पहिली आहेत. मात्र त्याच वेळी जसप्रीत बुमराहने पत्रकार परिषदेत बोललेल्या त्या गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुमराह खरंच कसोटी क्रिकेटचं कर्णधारपदाचं नेतृत्व करू शकतो का अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात नुकतंच बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. त्यानंतर आता बुमराहने कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 


काय म्हणाला बुमराह?
कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली तर हा सन्मान असेल आणि मला वाटत नाही की कोणताही खेळाडू याला नकार देईल. मीही त्याला अपवाद नाही. माझ्या क्षमतेनुसार यासाठी मला नेहमीच योगदान द्यायचे आहे.'' जबाबदारी घेणे आणि सहकाऱ्यांना मदत करणे ही माझी नैसर्गिक गुणवत्ता आहे. 


मला जर जबाबदारी मिळाली तर त्यासाठी मी नक्की तयार आहे असं बुमराह बोलताना म्हणाला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आता वन डे सीरिज सुरू होणार आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्यामुळे के एल राहुलकडे वन डे सीरिजची जबाबदारी देण्यात आली आहे.  त्यानंतर पुढे वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामना आहे.