मुंबई : टीम इंडियामध्ये पुजारा आणि रहाणे पाठोपाठ आता आणखी एका खेळाडूच्या खराब फॉर्मची चर्चा आहे. IPL 2021 च्या दुसऱ्या सत्रापासून हा खेळाडू विशेष कामगिरी करताना दिसला नव्हता. मात्र केप्टाऊनमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्ध सामन्यात आज त्याने चांगली कामगिरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिषभ पंत एक उत्तम विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र तो क्रिझवर आल्यानंतर थोडा सेट होऊन खेळत नाही. प्रत्येक बॉल खेळायला जातो आणि तिथे फसतो असं एकदा कोच राहुल द्रवीड म्हणाले होते. 


रिषभ पंतने आताचा एक सामना वगळला तर म्हणावी तेवढी काही विशेष कामगिरी केल्याचं दिसलं नाही. त्यामुळे त्याचा टीम इंडियातून पत्ता कट होऊ शकतो अशी चर्चा आहे. मात्र आता त्याने शतक ठोकल्यानंतर निवड समिती काय निर्णय घेणार हे पाहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 


पंतला आता के एल राहुल देखील स्पर्धक म्हणून आहे. के एल राहुल पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये येत आहे. वन डेमध्ये के एल राहुल जबरदस्त विकेटकीपिंग करताना सर्वांनीच पाहिलं आहे. आता टी 20 आणि कसोटीतही फलंदाजी आणि विकेटकीपिंग दोन्ही सांभाळलं तर कदाचित पंतला बाहेर बसावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


आता पुढच्या टी 20 आणि कसोटी सीरिजमध्ये कशा पद्धतीनं संघात बदल होतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण म्हणजे के एल राहुल पुन्हा फॉर्ममध्ये आल्यामुळे टी 20 मधील रिषभ पंतची जागा डळमळीत होऊ शकते.