रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय विराटने घेतला आहे. या मॅचमध्ये भारताने एक बदल केला आहे. कुलदीप यादवऐवजी शाहबाज नदीम याची टीममध्ये निवड झाली आहे. शाहबाज नदीमचा हा पदार्पणाचा सामना आहे. विराट कोहलीने मॅचआधी नदीमला टीम इंडियाची कॅप देऊन त्याचं स्वागत केलं. कुलदीप यादवच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे नदीमला संधी मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत २-०ने आघाडीवर आहे. विशाखापट्टणम आणि पुण्याच्या टेस्टमध्ये विजय मिळवून भारताने ही सीरिज आधीच खिशात टाकली आहे. आता दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरली आहे.


दक्षिण आफ्रिकेचा ओपनर मार्करम याच्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे तो या मॅचमधून बाहेर आहे. त्याच्याऐवजी क्विंटन डिकॉक ओपनिंगला बॅटिंग करेल, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डुप्लेसिसने टॉसवेळी दिली.


भारतीय टीम 


मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, ऋद्धीमान सहा, रवीचंद्रन अश्विन, शाहबाज नदीम, उमेश यादव, मोहम्मद शमी


दक्षिण आफ्रिकेची टीम


डीन एल्गार, क्विंटन डिकॉक, झुब्यर हमझा, फॅफ डुप्लेसिस (कर्णधार), टेंबा बवुमा, हेनरीच क्लासीन, जॉर्ज लिंडे, डेन पिडिट, कागिसो रबाडा, एनरिच नोर्टजे, लुंगी एनगिडी