नवी दिल्ली: दक्षिण अफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशा फरकाने आघाडीवर असलेला भारतीय क्रिकेट संघ रविवारी पोर्ट एलिजाबेथ येथे पोहोचली. या वेळी भारतीय संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भारतीय खेळाडू हॉटेलवर पोहोचताच पारंपरीक वाद्ये वाजविण्यात आली. दरम्यान, वाद्यांचा आवाज ऐकून उत्साहीत झालेल्या हार्दिक पांड्याने चालता चालताच ठेका धरला आणि तो नाचतच हॉटेलमध्ये गेला.


पोर्ट एलिजाबेथ येथे मंगळवारी (१३ फेब्रुवारी) ५वा एकदिवसीय सामाना खेळला जाणार आहे. पंड्याच्या या उत्साह कॅमेऱ्यांनी अचूक टीपला. बीसीसीआयने तर हा व्हिडिओ ट्विटरवरही शेअर केला आहे. पोर्ट एलिजाबेथच्या सेंट जॉर्ज पार्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताला पुन्हा एकदा पहिल्यांदा मालिका जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे.