मुंबई : दक्षिण अफ्रिकेविरूद्ध भारताने मंगळवारी(१३ फेब्रुवारी) शानदार विजय मिळवला. गेल्या पंचवीस वर्षातील कलंक पुसत मालिका खिशात टाकली. त्यामुळे भारताची ही कामगिरी ऐतिहासिक नक्कीच मानली जात आहे. पण, अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा काही पहिला कर्णधार नाही. भारताचे ६ कर्णधार असे आहेत. ज्यांनी दक्षिण अफ्रिकेच्या मैदानावर शानदार खेळी केली आहे. कोण आहेत ते कर्णधार?


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मोहम्मद अजहरूद्दीन : १९९२ ते १९९३ या कालावधीत अजहरूद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेवर १-०ने विजय मिळवला होता.

  • सचिन तेंडुलकर - १९९६ ते १९९७ या काळात सचिनच्या नेतृत्वाखाली भारताने ३ सामन्यांच्या टेस्ट मालिकेत दक्षिण अफ्रिकेला २-० असे लोळवले होते.

  • सौरभ गांगूली - २००१ ते २००२ या काळात सैरभ गांगूलीच्या नेतृत्वाखाली भारताने २ सामन्यांच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेला १-० असे पराभूत केले.

  • राहुल द्रविड - २००६ ते २०१७ या काळात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने ३ सामन्यांच्या टेस्ट मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला.

  • महेंद्रसिंग धोनी - धोनीच्यान नेतृत्वाखाली दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने ३ साम्यांच्या मालिकेत १-१ अशा फरकाने विजय मिळवला. सामना ड्रॉ राहिल्याने भारताला यश मिळाले होते.

  • महेंद्रसिंग धोनी - २०१३ ते २०१४ या काळात पुन्हा एकदा द. अफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेला जोरदार टक्कर दिली. पण, या मालिकेत भारताला १-० अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

  • विराट कोहली - २०१८ ते २०१९ या काळात भारतीय संघाने टेस्ट मालिका २-१ अशा फरकाने गमावली होती. पण, एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मात्र, भारताने दणदणीत विजय मिळवला. ६ एकदिसीय सामन्यांच्या मालिकेत भारीतय संघाने हा विजय ४-१ अशा फरकाने मिळवला.