Ind VS SL 1st T2oI | कसोटी पदार्पणात शतक, टी 20 डेब्यूत शून्यावर बाद, कोण आहे तो खेळाडू?
टीम इंडियाच्या (Team India) या खेळाडूने कसोटी पदार्पणात 134 धावांची खेळी केली होती.
कोलंबो : टीम इंडिया (Team India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात पहिली टी 20 मॅच (Ind VS SL 1st T2oI) खेळवण्यात येत आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलेय. या पहिल्या टी 20 सामन्यातून टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्थी (varun Chakravarthy) आणि मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या दोघांनी डेब्यू केलं. आपल्या पदार्पणात दमदार कामगिरी करावी, असं प्रत्येक क्रिकेटपटूला वाटतं. कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी टी 20 डेब्यूत मात्र अपयशी ठरलाय. बॅटिंगसाठी मैदानात येताच पृथ्वी पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. पहिल्याच चेंडूवर आऊट होण्याला क्रिकेटमध्ये गोल्डन डक म्हणतात. चमिरा करुणारत्नेने (Chamika Karunaratne) पृथ्वीला विकेटकीपर मिनोद भानुकाच्या (Minod Bhanuka)हाती कॅच आऊट केलं. (India vs sri lanka 1st T2oI opener Prithvi Shaw gone for a golden duck on his T20I debut)
शतकाने कसोटी कारकिर्दीची सुरुवात
पृथ्वीने वेस्टइंडिज विरुद्ध 2018 मध्ये वानखेडे स्टेडियमवर कसोटी पदार्पण केलं होतं. पृथ्वीने या सामन्यात त्याने 134 धावांची खेळी केली होती.
दरम्यान पृथ्वी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धमाकेदार कामगिरी करतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ब्रेक दिल्यानंतर पृथ्वीने जोरदार मुसंडी मारली. त्याने आपल्या नेतृत्वात मुंबईला विजय हजारे करंडकाचं विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये दिल्लीकडून शानदार कामगिरी केली. दरम्यान या पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पृथ्वी अधिक जोमाने कमबॅक करेल, असा आशावाद पृथ्वीच्या समर्थकांकडून व्यक्त केला जातोय.
टीम इंडियाची प्लेंइग इलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल.
श्रीलंका प्लेइंग XI | दासुन शनाका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका, धनंजय डी सिल्वा, चरीत असलंका, आशेन बंडारा, वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उदाना, अकिला धनंजय आणि दुष्मंथा चमीरा.