इंदूर : मुंबईकर रोहित शर्माने पुन्हा एकदा तुफान बॅटिंग केलेय. ३५ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितने आपल्या नावावर आणखी एक विक्रम केलाय. तर डेव्हिड मिलनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.


रोहितचा हल्लाबोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्ध खेळताना मुंबईकर रोहित शर्माने आज पुन्हा तुफान हल्लाबोल चढवला. त्यामुळे श्रीलंकन बॉलर हाताश झालेले पाहायला मिळालेत. लंकेच्या बॉलरची धुलाई करताना टी-20 मध्ये रोहित शर्माने क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक ठोकले. 


चौकार आणि षटकारची आतषबाजी


टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात झाली आहे.  ४३ बॉलमध्ये १२ चौकार ६ षटकार मारलेत. रोहितची फटकेबाजी पाहताना वाटत होते की, तो सहज द्विशतक ठोकेल. मात्र, तो ११८ धावांवर आऊट झाला.
 
टी-२० सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकत टीम इंडियाने १-० ने आघाडी घेतली आहे. आता इंदूरमध्ये होत असलेली मॅचही जिंकल्यास टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे.