कोलंबो : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येत आहे. श्रीलंकेला पावसाच्या व्यत्ययामुळे विजयासाठी सुधारित 227 धावांचे आव्हान मिळाले आहे. दरम्यान टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अंपायरने एलबीडबल्यू (Suryakumar Yadav controversial Lbw) आऊट दिल्याने नेटीझन्स चांगलेच संतापले आहेत. सूर्याला चुकीच्या पद्धतीने एलबीडबल्यू आऊट दिल्याचं नेटीझन्सचं म्हणंन आहे. यामुळे नेटीझन्सने अंपायरच्या या निर्णयाचा ट्विटरवर चांगलाच निषेध केला आहे. (india vs sri lanka 3rd odi Suryakumar Yadav controversial Lbw)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय घडलं? 


श्रीलंकेकडून सामन्यातील 23 वी ओव्हर प्रवीण जयविक्रमा (Pravin Jayvikrama) टाकायला आला. या ओव्हरमधील चेंडू सूर्याच्या पॅडला लागला. यावर प्रवीणने एलबीडबल्यूसाठी जोरदार अपील केली.  फिल्ड अंपायर कुमार धर्मसेनाने सूर्याला बाद घोषित केलं. पंचाच्या या निर्णायाला आव्हान देण्यासाठी सूर्याने डीआरएस (DRS) घेतला.




हाय व्होलटेज ड्रामा 


आता निर्णय थर्ड अंपायरच्या कोर्टात होता. या दरम्यान मैदानात हाय व्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला. ओव्हरमधील या शेवटच्या चेंडूचा रिप्ले पाहण्यात आला. या रिप्लेमध्ये बॉल हा इम्पॅक्ट लाईनीच्या बाहेर होता. त्यामुळे थर्ड अंपायरला निर्णय देण्यात समस्या निर्माण होत होती. सूर्या आऊट असल्याचं श्रीलंकेला वाटू लागलं. त्यामुळे निर्णयाआधीच लंकन खेळाडू जल्लोष करायला लागले. मात्र हा जल्लोष काही सेंकदांचाच होता. 



थर्ड अंपायरने सूर्याला नॉट आऊट घोषित केलं. सूर्याला डीआरएसमुळे चुकीच्या निर्णयाचा फटका बसला नाही. पण फिल्ड अंपायर कुमार धर्मसेनाने दिलेल्या या चुकीच्या निर्णयामुळे नेटीझन्सने त्याला चांगलेच फैलावर घेतले आहे.