IPL Auction मध्ये कोट्यवधींची बोली, आता Team Indiaत संधी, एक आठवड्यात पालटलं नशीब
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली, यात विराट, रोहितला डावलून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Team India : श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) काल भारतीय संघ (Team India) जाहीर केला. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माकडेच (Rohit Sharma) कर्णधारपद आहे तर टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टी-20 संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) दोन्ही संघात संधी देण्यात आलेली नाही. विकेटकिपर म्हणून संघात संजू सॅमसनची (Sanju Samson) पुन्हा एन्ट्री झाली आहे.
या खेळाडूचं पालटलं नशीब
टी-20 संघात काही नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यापैकीच एक नाव म्हणजे मुकेश कुमार (Mukesh Kumar). वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचं नशीब एका आठवड्यातच पालटलं आहे. 23 डिसेंबरला झालेल्या आयपीएलच्या (IPL) लीलावात मुकेश कुमारवर कोट्यवधींची बरसात झाली. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने मुकेश कुमारवर 5.5 कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं. या गोष्टीला एक आठवडा उलटत नाही तोच मुकेश कुमारला टीम इंडियातही संधी मिळाली आहे.
मुकेश कुमारला टी-20 संघात संधी
श्रीलंकेविरुद्ध 3 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी20 सीरिजसाठी मुकेश कुमारला संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये मुकेश कुमारला टीम इंडियात समावेश करण्यात आला देण्यात आला होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मुळचा बिहारमधल्या गोपालगंज इथं राहणारा मुकेश कुमारचा सामान्य कुटुंबात जन्म झाला आहे.
बांगलादेश-ए विरुद्ध दमदार कामगिरी
नुकताच 'इंडिया ए' संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. या संघात मुकेश कुमारही होता. 'बांगलादेश-ए' विरुद्ध मुकेश कुमारने पहिल्या सामन्यात 3 तर दुसऱ्या सामन्यात 6 विकेट घेत आपली छाप उमटवली. मुकेश कुमारने 33 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 123 विकेट घेतल्या आहेत. यात सहा वेळा 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तर 24 लिस्ट ए सामन्यात 26 विकेट त्याच्या खात्यात जमा आहेत.
भारत-श्रीलंका टी-20
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी पेटीएम इनसायडरवर तिकीटांची विक्री सुरु करण्यात आली आहे. कोविड संदर्भात कुठली ही सूचना आली नाही, त्यामुळे संपूर्ण स्टेडियम मधील तिकीट उपलब्ध असणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंकेमधील तीन सामन्यांची मालिका होणार असून तिन्ही सामने पहिला सामना मुंबई, दुसरा पुणे तर तिसरा सामना राजकोट येथे होणार आहे. पुण्यामध्ये दुसरा सामना 5 जानेवारीला होणार आहे.
टी-20 साठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (c), इशान किशन (wk), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.