गाले : भारतीय टेस्ट टीम निवडण्यात आली तेव्हा शिखर धवनचा त्यात समावेश नव्हता... यामुळे तो मनोमन दुखावलाही होता. परंतु, पुन्हा एकदा आपण पुनरागमन करू असा विश्वासही त्याला होता... आणि ही संधी मिळाली तेव्हा त्यानं त्या संधीचं सोनंही करून दाखवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी शिखरनं १९० रन्स ठोकले... शिखरच्या करिअरचा हा सर्वोच्च स्कोअर आहे. यामुळे, भारतानं पहिल्याच दिवशी खेळ संपेपर्यंत ३/३९९ असा स्कोअर उभा केला.


'जेव्हा माझी वाईट वेळ सुरू होती तेव्हा मला माहित होतं... मी रन्स काढले नाहीत तर मला टीममधून बाहेर काढलं जाईल... निश्चितच मी खूप दबावाखाली होतो... आणि जेव्हा खरोखरच मला टीमबाहेर काढण्यात आलं तेव्हा खूप दुखावलो गेलो' असं शिखरनं म्हटलंय.


इतकंच नाही तर, 'मी टेस्टमध्ये नव्हतो, त्यामुळेच मी कुटुंबीयांसोबत वेळ व्यतित करण्यासाठी आणि ट्रेनिंगसाठी मेलबर्नला जाणार होतो... परंतु, माझ्या भाग्यात काहीतरी वेगळंच होतं... मी हाँगकाँगमध्ये सुटट्या घालवत होतो... पण बोलावणं आलं आणि मी टीम इंडियात परतलो'


धवनचा श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी निवडल्या गेलेल्या टीम इंडियात समावेश नव्हता. परंतु, मुरली विजयला जखमी झाल्यानं मॅचमधून बाहेर पडावं लागलं... आणि शेवटच्या क्षणी शिखरला टीममध्ये घेण्याचा निर्णय झाला.