India VS Sri Lanka First ODI : गुवाहाटी (Guwahati) येथे नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघानं श्रीलंकेचा (ind vs sl) धुव्वा उडवला. 67 धावांनी पाहुण्या संघाला नमवत भारतीय संघानं मालिकेची चांगली सुरुवात केली. (Rohit Sharma Virat Kohli) रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सामन्यामध्ये संघाला समाधानकारक सुरुवात करुन दिली. ज्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनीही क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. भारतीय संघातील खेळाडूंच्या खेळीनं मैदान गाजवलं असतानाच काही खेळाडूंच्या वर्तनावरही कॅमेराच्या नजरा खिळल्या. त्यातलाच एक प्रसंग असा होता, जो पाहून अनेकांचेच डोळे चमकले (India VS Sri Lanka First ODI ). 


विराट आणि पांड्यामध्ये नेमकं काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Virat Kohli Century) विराट कोहलीची शतकी खेळी या सामन्यातील प्रमुख आकर्षणांपैकी एक होती. विराट ज्यावेळी खेळपट्टीवर असतो तेव्हातेव्हा तो संघाची धावसंख्या कशी वाढेल याच हिशोबानं फलंदाजी करत असतो. संयमी आणि आक्रमक अशी संतुलित खेळी करण्यासाठी तो ओळखला जातो. यावेळीसुद्धा त्याच्या अशाच खेळानं क्रीडारसिकांच्या मनाचा ठाव घेतला. 


पाहा : VIDEO: शेवटच्या ओव्हरमध्ये शमीचा नाट्यमय खेळ; कॅप्टनने कॅप्टनला वाचवलं अन् शनाकाचं शतक पूर्ण!


इथं हार्दिक आणि विराटच्या भागिदारीची (Hardik Pandya Virat Kohli Partnership) चर्चा सुरु असतानाच तिथे अचानकच काय बिनसलं कळेना. सहसा रनिंग बिटविन द विकेट्सदरम्यान, विराट आणि हार्दिकमध्ये कमालीचा ताळमेळ पाहायला मिळतो. पण, हा सामना त्याला अपवाद ठरला असंच म्हणावं लागेल. 


दोघं नजरेनंच भिडले... (Hardik Pandya Virat Kohli clash video)


सामन्यादरम्यान, पांड्यानं विराट कोहलीला दुसरी धाव घेऊ दिली नाही. इशारा करुनच त्यानं धावण्यासाठी तयारीत असणाऱ्या विराटला थांबवलं. यावेळी हार्दिकचा एकंदर अंदाज पाहता सामना पाहणारा प्रत्येकजण काहीसा बाचकला. खुद्द विराटसाठीही त्याची ही प्रतिक्रिया आणि ही वागणूक अनपेक्षित होती. हे सर्व पाहून विराटचाही संताप अनावर झाला. पण, त्यावर ताबा ठेवत त्यानं डोळ्यानंच हार्दिकला धाक दिला. बस्स.... इथं संघाचं नवंनवं उपकर्णधारपद मिळालेला पांड्या नरमला. इतका, की त्यानं विराटच्या नजरेलाही नजर दिली नाही. 



नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रिया 


'याला अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं म्हणतात... काय केलं यानं येऊन?', 'घ्या, यालाही आपणच मोठे झालो असं वाटू लागलं...', 'कोहलीला जे कळायचं ते क्षणात कळलं....' अशा सूचक कमेंट्स व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केल्या. 


सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान 43 व्या ओव्हरमध्ये हे नाट्य पाहाला मिळालं. जिथं, कसुन रजिथाच्या चेंडूवर विराटनं हलका स्पर्श केला. ऑनसाईडला बॅट स्क्वेअरच्या पलिकडे करत तो एक धाव घेण्यासाठी निघाला पण, तितक्यातच पांड्यानं त्याला रोखलं. पुढे याच गोलंदाजानं पांड्याला बाद केलं.