कोलंबो : टीम इंडियाचे (Team india)  दोन संघ एकाच वेळी 2 विविध दौऱ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताचा मुख्य संघ इंग्लंडला आहे. तर टीम इंडियाचा युवा संघ हा शिखर धवनच्या कॅप्टन्सीत श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Sri Lanka) आहे. मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने शिखर धवनला (shikhar dhawan) कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत. धवनची कर्णधार म्हणून ही पहिलीच वेळ आहे. धवनने कर्णधारपदाची जबाबदारी आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडली आहे. धवनने आपल्या नेतृत्वात श्रीलंकेचा पहिल्या 2 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. तर तिसऱ्या सामन्यात लंकेला पराभूत करुन क्लीन स्वीप देण्याची नामी संधी टीम इंडियाला आहे. तसेच यासह शिखरला पराक्रम करण्याची संधी आहे. (india vs sri lanka odi series shikhar dhawan have chance to makes record as a captain) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे संधी?    


या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 23 जुलैला खेळवण्यात येणार आहे. मालिकेत भारतीय संघ  2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकला तर भारताकडून श्रीलंकेला क्लीन स्वीप मिळेल. टीम इंडियाने हा पराक्रम केल्यास शिखर धवनच्या नावे खास रेकॉर्डची नोंद होईल. त्यामुळे शिखरला हा विशेष कारनामा करण्याची सुवर्णसंधी आहे.  याआधी असा कारनामा अगदी (Virat Kohli) विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) या स्टार कर्णधारांनाही जमलेला नाही.


कर्णधार म्हणून विजयी सुरुवात


टीम इंडियाला आतापर्यंत तोडीसतोड खेळाडू हे कर्णधार म्हणून लाभले. महेंद्रसिंह धोनीने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 28 वर्षानंतर जिंकवून दिला. सौरव गांगुलीने टीम इंडियाला लढायला शिकवलं. तर विराट या कर्णधारांपेक्षा वरचढ ठरतोय. पण या तिन्ही स्टार कर्णधारांना जे जमलं नाही, ती किमया शिखरने केली आहे. या तिन्ही खेळाडूंना कर्णधार म्हणून खेळलेल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण शिखरने आपल्या कॅप्टन्सीच्या इनिंगची विजयाने सुरुवात केली.


धोनीला कर्णधार म्हणून पहिल्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2-4 ने पराभव स्वीकारावा लागला होता. विराटलाही पहिल्या सामन्यात पराभवाचा 'सामना' करावा लागला. या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने विराटच्या कॅपटन्सीमधील भारताचा 161 धावांनी पराभव केला होता. तर गांगुलीला कर्णधार म्हणून असलेल्या पहिल्या मॅचमध्ये विंडिजकडून 42 धावंनी पराभव स्वीकारावा लागला. 


धवनची 'गब्बर' कामगिरी


धवनने या मालिकेत फलंदाजीसह कर्णधारपदाची दुहेरी जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. शिखरने आतापर्यंत पहिल्या 2 सामन्यांमध्ये  नाबाद 86 आणि 29 धावा केल्या आहेत.


दरम्यान उभयसंघातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना हा 23 जुलैला होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला श्रीलंकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव करण्याची संधी आहे. तर श्रीलंकेचा अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे.