IND vs SL T20 : भारत आणि श्रीलंकेमधील पहिल्यात टी-20 (IND vs SL T20 ) सामन्यात भारताने 2 धावांनी सामना जिंकला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळवला. भारताच्या 163 धावांचा पाठलाग करतान श्रीलंकेचा संघ निर्धारित 20 षटकात 160 धावा करू शकला.  भारताकडून शिवम मावीने पदार्पण सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. उमरान मलिक आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्याय. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यासोबतच  2023 मधील पहिला सामना जिंकत भारताने विजयाचा श्रीगणेशा केला. (India vs Sri Lanka T20 India won the first T20 match against Sri Lanka latets marathi sport news) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेची सुरूवात खराब झाली, सुरूवातीला सलमीवीर निसांकाला 1 धावांवर मावीने बाद केलं. कुसल मेंडिसने एक बाजू लावून धरली होती. दुसरीकडे संघाच्या  विकेट्स पडत होत्या. मावीने धनंजय डिसिल्वालाही 8 धावांवर माघारी पाठवलं. असलंका 12 धावा आणि भानुका राजपक्षे 10 धावा यांना अनुक्रमे उमरान मलिक आणि हर्षल पटेलने बाद केलं. त्यापाठोपाठ हर्षलनेही कुसल मेंडिसलाही 28 धावांवर माघारी पाठवलं.


श्रीलंकेच्या हातातून सामना गेला असं वाटत असताना कर्णधार दसुन शनाका आणि वानिंदु हसरंगा यांनी आक्रमक फटकेबाजी केली. शनाका मोठे फटके मारत सामना संपवेल असं वाटत होतं. मात्र उमरानच्या गोलंदाजीवर मारलेल्या शॉटवर चहलने कॅच पकडत सामन्यात पुन्हा रंगत आणली.  शनाका बाद झाला तरी मैदानावर चमिका करूणारत्ने मैदानात होता. 


दरम्यान, सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला, शेवटचं षटक अक्षर पटेल टाकत होता यामध्ये एक वाईड बॉल गेल्यावर चमिकाने षटकार मारत सामन्यात चुरस निर्माण झाली. शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेला 4 धावांची गरज होती त्यावर एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेताना मधुशनाका धावबाद झाला.