दिल्ली : फिरोजशहा कोटला  मैदानावर आज भारत श्रीलंका कसोटी सामन्याचा तिसरा दिवस अनेक कारणांनी गाजला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे भारताचा कर्णधार आनी रन मशीन म्हणून ओळखल्या जाणार्‍या विराट कोहलीने पुन्हा शतकांची दमदार खेळी केली. दरम्यान श्रीलंकन खेळाडू मात्र दिल्लीतील 'स्मॉग'ला वैतागले होते. 


मास्क लावून खेळाडू मैदानात  


'स्मॉग' मुळे त्रास होत असल्याने लंच ब्रेकनंतर अनेक श्रीलंकन खेळाडू मास्क लावून मैदानात उतरले. होते. सातत्याने त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर अखेर भारताने पहिला डाव ७ बाद ५३६ धावांवर घोषित केला. 


श्रीलंकेच्या या रडीच्या डावावर प्रेक्षकांनीदेखील स्टेडियममध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सुमारे १५-२० मिनिटं खेळ थांबवण्यात आला होता.  


विराट कोहली मात्र आरामात  


दमदार फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने मात्र ब्रेक घेतलेल्या वेळेदरम्यान मैदानात आराम करण्याचं ठरवलं. काही वेळ विराट मैदानातच पहुडला होता. हे दृश्य पाहून अनेकांना  महेद्रसिंग धोनीची आठवण झाली. 


ट्विटरवर प्रतिक्रिया  


'स्मॉग'च्या त्रासामुळे थकलेल्या श्रीलंकन खेळाडूंकडे दुर्लक्ष करत आरामात असलेल्या विराटच्या फोटोवर ट्विटरकरांनी अनेक मेम्स बनवले. सोशलमीडियावरही त्याबद्दल अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.  


 





 



दुसर्‍या दिवसाचा डाव  


दिल्लीत सुरू असलेल्या भारत श्रीलंकेचा दुसरा दिवस  131  धावा / 3 विकेट्स असा संपला. श्रीलंका ४०५  धावा मागे आहे. श्रीलंकेचा कर्णधार  दिनेश चंडीमल 25 बनवून नाबाद आहे.