मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला सध्या एका नव्या वळणावरून पुढे नेणाऱ्या आणि संघाच आघाडीचा फलंदाज म्हणून नावलौकिक असणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. संधाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केल्यापासून रोहितनं बऱ्याच खेळाडूंना संघात स्थानही दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यानच आता बीसीसीआयनं (BCCI) श्रीलंकेसोबतच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 


पण, संघ निवडत असताना निवड समितीनं काही निकष नजरेत घेत यामध्ये मैत्रीलाही जागा दिली नसल्याचं कळत आहे. 


कारण, काही चेंडूंमध्येच सामन्याचं चित्र पालटणाऱ्या आणि रोहित शर्माचा खास मित्र असणाऱ्या शिखर धवन यालाच निवड समितीनं डावललं आहे. 


मुख्य म्हणजे नवख्या खेळाडूंना संघात स्थान देत त्यांच्या कारकिर्दीला पुढे नेण्यास हातभार लावणारा रोहित संघाच्या कर्णधारपदी असूनही त्याला आपल्या खास मित्रासाठी संघात जागा करता आलेली नाही. 


श्रीलंकेसोबतच्या मालिकेसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) याला टी20 आणि कसोटी मालिकेपैकी कोणत्याही सामन्यासाठी संघात स्थान मिळालेलं नाही. 


मागील चार वर्षांपासून शिखर कसोटी संघात परतलेला नाही. आपल्या खेळामध्ये धवन सातत्य दाखवण्यात अपयशी ठरत असल्यामुळं त्याच्या जागी संघात अनेक युवा खेळाडूंना निवड समिती प्राधान्य देताना दिसत आहे. 


एकिकडे धवनला श्रीलंकेसोबतच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नसतानाच दुसरीकडे संजू सॅमसन याचं दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झालं आहे. 


तर, ऋषभ पंतला पर्याय म्हणून संघात के.एस. भरत याला जागा मिळाली आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळं त्याला ही संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा संघात स्थान राखून आहेत. 


श्रीलंका मालिकेसाठी कसा असेल भारतीय T20 संघ? 


रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जुयवेंद्र चहल, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, आवेश खान. 


भारतीय कसोटी संघ 


रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, केएस भरत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी, उमेश यादव, सौरभ कुमार.