IND vs WI:वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी BCCI चा कोट्यावधीचा खर्च, आकडा एकूण थक्क व्हाल
खरंच इतके कोटी खर्च करण्यात आले आहेत वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी?
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वन डे सामन्यांची सीरिज 22 जुलै उद्यापासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी विंडिजमध्ये दाखल झालेल्या टीम इंडियासाठी बीसीसीआयन कोट्यवधी रुपये खर्च केल्याची माहीती आहे. मात्र इतके पैस का खर्च केले याचे कारण समोर आले नव्हते.
इंग्लंड विरुद्ध शेवटची वनडे 17 जुलै रोजी संपली, त्यानंतर विश्रांती घेतलेले खेळाडू परतले. मात्र, वेस्ट इंडिजला जाणारे खेळाडू चार्टर्ड विमानाने पोहोचल्याची माहिती आहे. या त्याच्या प्रवासावर तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
सूत्रानुसार, बीसीसीआयने चार्टर्ड फ्लाइटवर 3.5 कोटी रुपये खर्च केले. ज्यामुळे टीम इंडिया मंगळवारी दुपारी 11.30 वाजता मँचेस्टरहून पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद आणि टोबॅगोची राजधानी) येथे पोहोचली. कोविड-19 मुळे संघासाठी चार्टर्ड फ्लाइट बुक करण्याचे कारण नव्हते. तर व्यावसायिक विमानात इतकी तिकिटे बुक करणे अवघड असल्याने चार्टर्ड फ्लाइट बुक केल्याची माहिती आहे. या फ्लाईटमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांसह 16 खेळाडूंचा समावेश होता.
विंडिज दौऱ्यावर पोहोचलेल्या टीम इंडियाला आज सरावात अडचणी आल्या. कारण पावसामुळे त्यांना बाहेर सराव करता आला नाही. त्यामुळे त्याना इनडोअर सराव करावा लागला.बीसीसीआयने गुरुवारी इनडोअर नेटवरील व्हिडिओ ट्विट केला होता.