मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धचा तिसरा वनडे सामना आज खेळवला जात आहे. या वनडे मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. आज तिसरा वनडे सामना जिंकून टीम इंडिया क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहेत. त्यात आता दुसरा वनडे सामन्यातला एक रंजक किस्सा आता समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने पहिला वनडे सामना 3 धावांनी जिकंला होता. दुसरा वनडे सामना 2 विकेटस राखून जिंकला. मात्र हा सामना जिंकणे टीम इंडियासाठी तितकेसे सोप्पे नव्हते. दुसरा वनडे सामन्यात चेस करताना टीम इंडिया पराभवाच्या छायेत होती. एका मागून एक विकेट पडत होते. यामुळे टीम इंडियाचा कोच राहूल द्रविड टेन्शनमध्ये होता. या संदर्भातला तो किस्सा आहे. 


श्रेयस अय्यर या सामन्याबाबत बोलताना म्हणाला की,  खरे सांगायचे तर राहूल द्रविड टेन्शनमध्ये होता. तो सतत मैदानावर खेळाडूंना मेसेज पाठवत होता. मात्र खेळाडू दबावात नव्हते. याच कारणामुळे हा सामना जिंकण्यात टीम इंडियाला यश आले. तसेच श्रेयस पुढे म्हणाला की, मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. पण मला माझ्या धावांचे सेंच्यूरीत रुपांतर करण्यात आले नाही असे तो म्हणतो.   


दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजच्या शाई होप (115) आणि कर्णधार निकोलस पूरन यांच्या 74 धावांच्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने 6 बाद 311 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली, मात्र 48 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर सातत्याने विकेट पडत राहिल्या आणि 4 बाद 178 धावा झाल्या. श्रेयस अय्यर (63) पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर भारताचा विजय अवघड वाटत होता. यानंतर संजू सॅमसन 54, दीपक हुडा 33 आणि अक्षर पटेलच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर भारताने दोन चेंडू राखून सामना जिंकला.


अक्षर पटेलने 35 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह झंझावाती अर्धशतक झळकावून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अशाप्रकारे विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका सलग 12व्यांदा जिंकण्यात भारताला यश आले, हा विश्वविक्रम आहे.