India vs West Indies Series : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर टीम इंडियाला ( Team India ) मोठा ब्रेक मिळाला. यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली आहे. 12 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 टेस्ट सामने, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. 2019 मध्ये भारताने शेवटचा वेस्ट इंडिज दौरा केला होता. त्यावेळी प्रत्येक फॉरमॅटमध्ये सिरीज जिंकली होती. दरम्यान आता सुरु होणारी सिरीज नेमकी कुठे पहायची असा सवाल क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारणपणे भारताचे सामने हे हॉटस्टावर दिसतात. मात्र वेस्ट इंडिजविरूद्धचा दौऱ्यावरील सामने सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्क किंवा स्टार स्पोर्ट्स चॅनलवर दिसणार नाहीत. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅन कोड ऍप्लिकेशनवर दिसणार आहे. याशिवाय याचं लाईव्ह स्ट्रीमिंग फक्त जिओ सिनेमावर केलं जाणार आहे. 


TV वर कुठे पाहता येणार सामना?


घरी बसून टीव्हीवर सामना पाहायचा असेल तर मात्र चाहत्यांकडे एकच पर्याय आहे. यासाठी चाहत्यांना दूरदर्शन म्हणजेच DD Sports वर लाईव्ह सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे टीव्हीवर केवळ एकाच चॅनलवर चाहत्यांना भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. 


कसा असणार भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दौरा


पहिला टेस्ट सामना - 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
दुसरा टेस्ट सामना - 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन


पहिली वनडे - 27 जुलै, ब्रिजटाऊन
दुसरी वनडे - 29 जुलै, ब्रिजटाऊन
तिसरी वनडे - 15 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन


पहिली T20 - 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरी T20 - 6 ऑगस्ट, गयाना
तिसरी T20 - 8 ऑगस्ट, गयाना
चौथी T20 - 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवी T20 - 13 ऑगस्ट, फ्लोरिडा


विंडीज दौऱ्यावर कशी असेल टीम इंडिया ( Team India ) ?


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन,  रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल , जयदेव उनादकट, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार