IND vs WI: निकोलस पूरनचं कॅप्टन रोहित शर्माला चॅलेंज
`तो आलाय आता टीम इंडियाचं काही खरं नाही` निकोलस पूरनचं कॅप्टन रोहित शर्माला चॅलेंज
मुंबई : टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी वेस्ट इंडिजची टीम सज्ज झाली आहे. आजपासून टी 20 सीरिज सुरू होत आहे. पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीममध्ये मोठे बदल निकोलस करणार आहे. निकोलसने रोहित शर्माला चॅलेंज दिलं आहे.
वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायरला भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी T20 सीरिजसाठी टीममध्ये परतला आहे. तर शेल्डन कॉट्रेल आणि ऑलराऊंडर फॅबियन अॅलन सध्या टीममध्ये खेळताना दिसणार नाहीत. शेल्डन सध्या दुखापतीतून सावरला आहे आणि ऍलन वैयक्तिक कारणांमुळे टी 20 सीरिज खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
काय म्हणाला निकोलस पूरन?
इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार निकोलस पूरनने रोहितला सामन्याआधी चॅलेंज दिलं आहे. 'वेस्ट इंडिजची टीम पूर्ण बदलेली असेल. आम्ही आमच्या मास्टरप्लॅनवर काम करत आहोत. आमच्याकडे हिटमायर आहे. तो टीममध्ये परतला आहे त्यामुळे आम्ही भारताला पराभूत करण्यात यशस्वी होऊ असं तो म्हणाला.
टीम इंडियाने वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला. तिन्ही सामने टीम इंडियाने जिंकला आहेत. पहिल्या सामन्यात 3 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात 2 गडी राखून तर तिसऱ्या सामन्यात 119 धावांनी विजय मिळवला आहे.
वेस्ट इंडिज पराभवाचा वचपा टी 20 सीरिजमध्ये काढण्यासाठी टीममध्ये मोठे बदल करू शकते. हिटमायर टीममध्ये परतला आहे. त्याचा फायदा टीमला होणार आहे.
निकोलस पूरन, रोवमॅन पॉवेल, शमरह ब्रूक्स, डोमिनिक ड्रेक्स, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, कीमो पॉल, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, डेवोन थॉमस, हेडन वॉल्श जुनियर