नवी दिल्ली : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेशी आता भिडणार आहे. भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यापासून श्रीलंकेने मार्ग थोडा कठीण करुन ठेवला आहे. पण भारत दोन प्रकारे उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाच्या परिस्थितीमध्ये संघ उपांत्य फेरीत पोहचू शकतो. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना एक-एक गुण मिळतील. तर भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे 3-3 गुण होतील. आफ्रिकेच्या तुलनेत चांगल्या रनरेटमुळे भारत उपांत्य फेरीत पोहचू शकतो.


पाकिस्तान-श्रीलंका सामनाही पावसामुळे रद्द झाला तर या दोन्ही संघांना 3-3 गुण मिळतील. अशा वेळी उपांत्य फेरीत चांगला रनरेट असलेली टीम पोहोचेल. आता चारही संघाचे 3-3 पॉइंट झाले तर भारत सेमीफायनलमध्ये जाईल कारण भारताचा रनरेट चांगला आहे.


भारत आणि दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला सामना जिंकला आणि दुसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे आता कोणाला सेमीफायनलचं तिकीट मिळतं हे पाहावं लागेल.