T20 World Cup 2022 जेतेपद `हा` संघ जिंकणार, एबी डिव्हिलियर्सच्या भाकितानं खळबळ
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचं चित्र स्पष्ट झालं असून अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड, तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचा (T20 World Cup Semi Final) सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे.
AB de Villiers On T20 World Cup: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचं चित्र स्पष्ट झालं असून अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड, तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचा (T20 World Cup Semi Final) सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. त्यामुळे या चार संघातून अंतिम फेरी कोण गाठणार याबाबत उत्सुकता असताना दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं भाकित वर्तवलं आहे. कोणते दोन संघ अंतिम फेरीत पोहोचणार आणि कोण बाजी मारणार याबाबत सांगितलं आहे. एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) सध्या भारतात आहे. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये सहभाग घेतला नव्हता. आता मेंटॉर म्हणून आयपीएलमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
एबी डिव्हिलियर्सनं वर्तवलेल्या भाकितानुसार टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात होईल. त्याचबरोबर जेतेपदासाठी त्याने भारताला पसंती दिली आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, "मला वाटतं भारत आणि न्यूझीलंड या संघात अंतिम सामना होईल. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव फॉर्मात आहेत. त्यामुळे टीम इंडियाला फायदा होईल. भारताचा संपूर्ण संघच चांगली कामगिरी करत आहे."
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत भारताने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. 8 गुणांसह भारतीय संघ ब गटात अव्वल स्थानी आहे. भारताला सुपर 12 फेरीत एकमात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेनं 5 विकेट आणि दोन चेंडू राखून भारताचा पराभव केला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरी गाठू शकलेला नाही.