डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने न्यूझीलंडवर १८६ धावांनी दणदणीत विजय मिळवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेश्वरी गायकवाडचा तिखट मारा आणि तिला मिळालेली इतर गोलंदाजांची साथ यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या ७९ धावांत संपुष्टात आला. 


कर्णधार मिताली राजचे दमदार शतक आणि वेदा कृष्णमूर्ती-हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत २६५ धावा केल्यात.


मितालीने १२३ चेंडूत ११ चौकारांसह १०९ धावा तडकावल्या. तिला कौरा आणि वेदाने चांगली साथ दिली. २१ धावांत भारताचे दोन गडी बाद झाले असताना मिताली आणि कौर यांनी खेळपट्टीवर टिकून राहत तिसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची पार्टनरशिप केली. कौरने ९० चेंडूत ६० धावा केल्या. 


कौर बाद झाल्यानंतर मितालीने वेदासह धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. पाचव्या विकेटसाठी वेदा आणि राजने १०८ धावांची भागीदारी केली. यामुळेच भारताला अडीचशे धावा पार करता आल्या.


प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडला केवळ ७९ धावाच करता आल्या. राजेश्वरी गायकवाडने पाचविकेट घेत न्यूझीलंडचा दाणादाण उडवून दिली. तिला इतर गोलंदाजांनीही चांगली साथ दिली.