Tears In Smriti Mandhana Eyes : आजचा दिवस भारतासाठी खास ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) टीम इंडियाला मोठं यश मिळालंय. सकाळी देशाला नेमबाजीत पहिलं सुवर्णपदक मिळालं, यानंतर महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. त्यामुळे सध्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करणारी स्मृती मानधना (Smriti Mandhana) मात्र विजयानंतर भावूक झाल्याचं दिसून आलं. नेमकं काय झालं? आणि स्मृती नेमकी काय म्हणाली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर झालं असं की, भारतीय महिला क्रिकेट संघ (India womens cricket team) आपल्या इतिहासात प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला होता. आशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 116 धावा केल्या. यानंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाने श्रीलंकेला 20 षटकांत 97 धावांवर रोखलं अन् सामना खिशात घातला. त्यामुळे टीम इंडियाने गोल्ड मेडल मिळवलं आहे. विजयानंतर जेव्हा टीम इंडियाच्या खेळाडूंना मेडल (Gold Medal) देण्यात आले अन् राष्ट्रगीत वाजवलं गेलं. तेव्हा स्मृती मानधनाच्या डोळ्यात अश्रू आले. 


काय म्हणाली Smriti Mandhana ?


आपण नीरज चोप्राला सुवर्ण जिंकताना पाहिलं आहे. जेव्हा राष्ट्रगीत वाजलं आणि भारताचा राष्ट्रध्वज वर गेला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आलं, हे खूपच खास क्षण होता. शेवटी गोल्ड मेडल गोल्ड मेडल असतं, आज आम्ही आमचं सर्वोत्तम योगदान दिलं याचा खरोखर आनंद आहे, असं स्मृती मानधना म्हणाली आहे. 



दरम्यान, भारताने आत्तापर्यंत 2 गोल्ड मेडल, 3 सिल्वर मेडल आणि 6 बॉन्झ मेडल असे एकून 11 मेडल जिंकले आहेत. तर एकून 66 मेडलसह चीन अव्वल स्थानी आहे. चीनच्या खात्यात एकून 39 गोल्ड मेडल आहेत. तर दुसऱ्या क्रमाकांवर कोरियाचा नंबर लागतो. कोरियाकडे एकूण 33 मेडल आहेत. त्यात 10 गोल्ड आणि 10 सिल्वर मेडलचा समावेश आहे.