नवी दिल्ली : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप 2018 च्या रोमांचक फायनलमध्ये भारताने बांगलादेशला 3 विकेटने हरविले. पहिल्यांदा फलंदाजी निवडणाऱ्या बांगलादेशने भारतासमोर 223 रन्सचे लक्ष ठेवलं होतं. 7 विकेट्सच्या बदल्यात शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाने हे लक्ष्य पूर्ण करत आशिया कपवर आपलं नावं कोरलं. 34 वर्षातील रोमहर्षक सामना झाल्याचे म्हटले जात आहे. बांगलादेशच्या टीमने भारताला कडवी टक्कर दिल्याने त्यांचंही तोंडभरून कौतूक होतयं.


रोमांचक सामना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर कुलदीप यादवने एक रन्स घेतला. त्यानंतर केदार जाधवने दुसऱ्या बॉलवर एक रन्स घेतला. आता टीम इंडियाला जिंकण्यासाठी 4 बॉल्सवर 4 रन्स हवे होते. तिसऱ्या बॉलवर कुलदीप यादवने 2 रन्स घेतले पण पुढच्या बॉलवर तो रन्स घेऊ शकला नाही. आता टीम इंडियाला दोन बॉलवर 2 रन्स हवे होते. इथे कुलदीपला आणखी एक रन घेता आली. मॅचचा रोमांच एका रन्सवर येऊन पोहोचला. मेहमूदुल्लाहच्या शेवटचा बॉल लेग साइडला होता, केदारचा अंदाज चुकला पण बॉल त्याच्या पॅडला लागून फाइन लेगवर गेला आणि केदारला एक रन मिळाला. 


केदारचा जलवा 


 रोहित शर्माने 55 बॉल्समध्ये 48 धावांची सर्वोत्तम खेळी केली. यामध्ये 3 फोर आणि एक सिक्स मारला. दिनेश कार्तिकने 37 तर महेंद्रसिंग धोनी 36 रन्स करुन आऊट झाला. दुखापत असूनही केदार जाधवने 27 बॉल्समध्ये 23 रन्सची नाबाद खेळी केली.