इंग्लंडविरुद्ध भारताची विजयी सलामी
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिलीये. पहिल्याच सामन्यात इंग्लंडला ३५ धावांनी पराभूत केलेय.भारताने विजयासाठी ठेवलेले २८१ धावांचे आव्हान पार करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २४६ धावांवर गारद झाला.
डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिलीये. पहिल्याच सामन्यात इंग्लंडला ३५ धावांनी पराभूत केलेय.भारताने विजयासाठी ठेवलेले २८१ धावांचे आव्हान पार करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २४६ धावांवर गारद झाला.
दीप्ती शर्माने तीन विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर शिखा पांडेने दोन विकेट घेतल्या आणि इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. इंग्लंडकडून फ्रॅन विल्सनने सर्वाधिक ८१ धावा केल्या.
तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना तीन गड्यांच्या मोबदल्यात २८१ धावा केल्या होत्या. भारताच्या सलामीवीर पूनम राऊतने ८६ आणि स्मृती मंदनाने ९० धावा करताना दमदार सलामी दिली.
कर्णधार मिताली राजनेही ७१ धावांची खेळी करताना संघाची धावसंख्या अडीचशे पार नेण्यात मदत केली.