डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने टॉस जिंकताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने खेळ उशिरा सुरु होतोय. त्यामुळे सामन्यातील षटके कमी झालीत. हा सामना ४२ षटकांचा खेळवण्यात येणार आहे. 


भारताला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार करावा लागेल. या आधी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले होते. त्यामुळे या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत उत्सुक आहे.