मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने टॉस जिंकताना बॅटिंग करण्याचा निर्णय़ घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा २०० वा सामना आहे. २००८मध्ये कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 


भारताने हा वनडे सामना जिंकल्यास ते पुन्हा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी येऊ शकतात. 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ या मालिकेतही विजयी परंपरा कायम राखण्यासाठी सज्ज झालाय. कर्णधार विराट कोहली आणि कंपनी विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरतील. 


भारतीय संघात सध्या चायनामन कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल असे युवा क्रिकेटर्स आहेत. कुलदीप यादव, युझवेंद्र, हार्दिक यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या मालिकेतही त्यांच्याकडून हीच अपेक्षा असेल. 


दुसरीकडे न्यूझीलंड संघाची मदार अनुभवी क्रिकेटर रॉस टेलरवर असेल. अध्यक्षीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला होता.