भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) कोर्टप्रमाणे सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत आहेत. गेल्या महिन्याभरापासून ती आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत असून, यादरम्यान वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन तिची चाहत्यांसह शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान (Paris Olympic) सायना नेहवालने काही विधानं केली होती, ज्यामुळे ती वादात अडकली होती. ज्यावरुन तिचे चाहत्यांसह वादही झाले होते. दरम्यान सायना नेहवालचा पती पारुपल्ली कश्यपने (Parupalli Kashyap) पॉडकास्टदरम्यान चाहत्यांच्या कमेंट्सचा विषय काढला. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालला मिळालेलं कांस्यदक गिफ्ट होतं असं काही चाहते म्हणत आहेत असा प्रश्न त्याने विचारला. यावर सायना नेहवाल संतापली आणि अशा कमेंट करणाऱ्यांना उत्तर दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान तिने काहीतरी विधान केलं होतं आणि कमेंटमध्ये काहीजण तिला कांस्यपदक गिफ्टमध्ये मिळालं आहे असं म्हणत होते," असं पारुपल्ली कश्यपने रेडिओ जॉकी अनमोल आणि अभिनेत्री अमृता राव यांच्यासह चॅटमध्ये सांगितलं. पारुपल्ली कश्यपने सोशल मीडिया ट्रोलर्सचा विषय काढल्याचं ऐकताच सायना नेहवालने व्यक्त होत, जे असा विचार करतात ते आधी ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याच्या लायकीचे व्हायला हवेत असं म्हटलं. 


"ऑलिम्पिकमधील पातळीच्या पात्रतेचे तर व्हा आधी. आधी तुम्ही ऑलिम्पिकसाठी पात्र तर होऊन दाखवा," असं सायना नेहवाल म्हणाली. सायना नेहवालला 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक देण्यात आलं होतं. सायना नेहवालसमोरील प्रतिस्पर्धी खेळाडू चीनची वांग झिन हिच्या पायाला दुखापत झाल्याने ती सामन्यातून बाहेर पडली होती. यामुळे सायनाला विजयी घोषित करत कांस्यपदक देण्यात आलं होतं. 


खरं तर सायनाने कुस्तीपटू विनेश फोगाटवर केलेल्या विधानांनुळे अनेकांनी नाराजी जाहीर केली होती. वजन वाढल्याने विनेश फोगाटला 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आलं होतं.


या विषयावर बोलताना सायना म्हणाली, "सर्वसाधारणपणे, अशा प्रकारच्या चुका कोणत्याही खेळाडूकडून या स्तरावर होत नाहीत. हे कसं काय घडलं हा प्रश्न आहे. कारण तिच्याकडे एक मोठी टीम आहे. तिच्याकडे अनेक प्रशिक्षक, फिजिओ आहेत. त्या सर्वांना खूप वाईट वाटत असेल, मला कुस्तीच्या नियमांबद्दल पुरेशी माहिती नाही. पण खेळाडू म्हणून मला वाईट वाटत आहे". सायना नेहवालने निवृत्तीचे संकेतही दिले आहेत. आता आपलं शरीर तितका ताण सहन करु शकत नाही असं ती म्हणाली आहे.