तिरुवनंतपूरम : आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना खेळला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा गोलंदाज मिशेल सेंटनर सोमवारी म्हणाला की, भारत विरूद्ध सध्या सुरू असलेल्या टी-२० मध्ये योग्य लेग्थने गोलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा स्पिनर ईश सोढी याला फायदा मिळत आहे. सोढीने पहिल्या टी-२० सामन्यात २५ रन्स देऊन एक विकेट घेतली. 


तो म्हणाला की, ‘लेंग्थ खूप महत्वाची असते. ईशने खूप चांगल्या लेंग्थने गोलंदाजी केली असून त्यामुळे टीम इंडियाच्या बॅट्समनना अडचणी गेल्या. मी सुद्धा असेच करण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहलने दिल्लीत चांगली गोलंदाजी केली होती. पण दुस-या सामन्यात तो नशीबवान ठरला नाही’.


महेंद्र सिंह धोनीबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘तो स्पिन आणि सीम गोलंदाजीवर खूप चांगला खेळतो. मी सुरूवातीला कोणताही अतिरिक्त प्रयत्न केला नाही’. इतर सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या झालेल्या स्थितीवर तो म्हणाला की, ‘आम्ही प्रत्येक सामना पुढील सामन्यासारखा खेळतो. दोन सामने गमवण्यापेक्षा बरे आहे की, बरोबरीत रहावे. आम्ही चांगलेच उत्साही आहोत. टीम इंडिया आपल्या देशात चांगले खेळत आहे. त्यांना हरवणे कठिण आहे. आम्ही सीरिजला निर्णायक सामन्यापर्यंत घेऊन आलो आहोत’.