Rohit Sharma Forgot His Passport: रविवारी टीम इंडियाने ( Team India ) नवा इतिहास रचला. कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशिया कपवर आठव्यांदा नाव कोरलं. दरम्यान यानंतर मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma ) एक मोठी घटना घडली. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याची विसरण्याची सवय आता प्रत्येकाला माहिती झालीये. श्रीलंकेतून भारतात परतत असताना यावेळी रोहित शर्मा चक्क पासपोर्ट विसरला असल्याचं समोर आलंय. 


रोहित शर्माची विसरण्याची सवय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माला अनेकदा मौल्यवान वस्तू विसरतो. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) या विसरण्याच्या सवयीचा खुलासा विराट कोहलीने एका मुलाखतीदरम्यान केला होता. दरम्यान याचीच प्रचिती श्रीलंकेत पहायला मिळाली. विजेतेपद पटकावल्यानंतर रोहितसह ( Rohit Sharma ) टीम इंडियाचे अनेक खेळाडू घरी परतण्यासाठी टीम बसमध्ये चढत होते. यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आपला पासपोर्ट हॉटेलमध्येच विसरला होता. यावेळी सपोर्ट स्टाफच्या एका सदस्याने तो आणून त्याला दिला. दरम्यान याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) या सवयीबद्दल चाहत्यांना कोहलीने केलेलं ते विधान आठवलं. यावेळी कोहलीने सांगितलं होतं की, रोहित अनेकदा हॉटेलमध्ये आपला आयपॅड, मोबाईल आणि पासपोर्टही विसरतो. इतकंच नाही तर एकदा तो त्याच्या लग्नाची अंगठी हॉटेलमध्ये विसरला होतं. 


रविवारीही असंच काहीसं घडलेलं दिसून आलं. एशिया कपची ( Asia cup 2023 ) फायनल संपल्यानंतर रोहित हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरला. यावेळी पासपोर्ट मिळाल्यानंतर टीम बस हॉटेलमधून एअरपोर्टकडे रवाना झाली.



एशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाचा विजय


रविवारी श्रीलंका विरूद्ध भारत यांच्यामध्ये एशिया कपची फायनल रंगली होती. यावेळी आशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धचा सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात मोहम्मद सिराजच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला अवघ्या 50 रन्सवर माघारी पाठवलं. यानंतर त्यांनी हे लक्ष्य 6.1 ओव्हरमध्ये एकंही विकेट न गमावता पूर्ण केलं.


एशिया कपमध्ये रोहितची उत्तम फलंदाजी


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एशिया कप 2023 मध्ये चांगली कामगिरी केली. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. यावेळी रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 10,000 रन्स पूर्ण केले.